केळी
जमीन :-
काळी कसदार, भुसभुशीत, गाळाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी, जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.
लागवड :-
१.५ x १.५ मिटर अंतरावर जून - जुलैत लागवड करावी ( हेक्टरी ४४४४ झाडे ) सिंचनाची व्यवस्था असल्यास (कांदेबाग) ओक्टोम्बर महिन्यात लागवड करावी.
हवामान :-
समशीतोष्ण प्रदेश व कमी वर मानवतो.
पाणी पुरवठा :-
४५ ते ६० पाण्याच्या पाळ्या आवश्यक आहेत. ठिबक सिंचनाचा उपयोग केल्यास ३० ते ४० टक्के पाण्याची बचत होते.
फुलोऱ्याची वेळ :-
एप्रिल - ऑगस्ट.
फळे तोडणीच्या हंगाम :-
जुलै ते जानेवारी, केळीला फुल आल्यानंतर सुमारे १०० ते १२० दिवसात घड कापणीस योग्य होतो.