Language

संत्री / मोसंबी

जमीन :-
 मध्यम काली, सुमारे एक ते दीड मित्र खोल व त्याखाली कच्चा मुरूम असणारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. मोसंबीला संत्र्यापेक्षा काही प्रमाणात हलकी जमीन योग्य ठरते. जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्याच्यावर असू नये.
लागवडीचा हंगाम :-
 मुख्यत्वे पावसाळ्यात चौरस पद्धतीने, अंतर ६ x ६ मित्र ( हेक्टरमध्ये २७७ झाडे), खड्ड्याचा आकार १ x १ x १ मीटर.
पाणी पूरवठा :-
 दहा वर्षे व त्यावरील वयाच्या झाडांना दरवर्षी पाण्याच्या २८ ते ३० पाळ्या लागतात. दुहेरी आळे पद्धतीने पाणी द्यावे. पाणी टंचाईच्या दोन किंवा चार दांड पद्धत वापरावी, शक्य असेल तर ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. त्यामुळे ३० - ४० टक्के पाण्याची बचत होते. ठिबक सिंचनाद्वारे पाणी देताना दररोज बाष्पोपर्णात्सर्जनाच्या ८० टक्के पाणी द्यावे, त्यामुळे दर्जेदार उत्पादनात वाढ होऊन ४० टक्के पर्यंत पाण्याची बचत होते.
काढणी :-
  फळधारणेपासून फळे तयार होण्यास २०० ते २४० दिवस लागतात. आंबिया बहाराची फळे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये तर मृग बहाराची फळे मार्च-एप्रिल मध्ये तयार होतात. फळांचा हिरवा रंग जाऊन पिवळसर नारंगी रंग येतो. सालीवर चकाकी येऊन तेलग्रंथी स्पष्ट दिसू लागतात. तोडणीपूर्वी कार्बेन्डाझिम ०.१ % चे ( १० ग्रॅम + १० लिटर पाणी ) दोन फवारे १५ दिवसाच्या अंतराने देण्यात यावे. त्यामुळे फळे साठवणुकीत टिकतात. भरपावसात किंवा उन्हात तोडणी करून फळे बागेतच ठवू नयेत. फळ टोलनाच्या पिशवीतून फळे सरळ प्लॅस्टिकच्या कॅरेट्समध्ये भरावीत व सावलीत ठेवावि. फळे काढताना फळाच्या सालीला इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.